Pune | राजेंद्र बरकडे यांची पुणे जिल्हा काँग्रेस ओबीसी विभाग अध्यक्षपदी निवड

 


पुरंदर रिपोर्टर -


             अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, अखिल भारतीय ओबीसी विभागाचे अध्यक्ष डॉ. अनिलकुमार जयहिंद यांच्या आदेशानुसार तसेच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या मान्यतेने आणि काँग्रेस ओबीसी विभाग प्रदेशाध्यक्ष भानुदास माळी यांच्या मार्गदर्शनाखाली राजेंद्र बरकडे यांची पुणे जिल्हा काँग्रेस ओबीसी विभागाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.



अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारताना राजेंद्र बरकडे यांनी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांची प्रेरणा घेऊन पक्ष तळागाळापर्यंत पोहोचवण्याचा संकल्प व्यक्त केला. ते म्हणाले, “काँग्रेस पक्षाच्या विचारसरणीचा प्रसार करून ओबीसी समाजाच्या प्रश्नांसाठी सक्रियपणे काम करणार आहे.”



बरकडे यांच्या निवडीबद्दल पुणे जिल्हा काँग्रेस कमिटी कार्याध्यक्ष संग्राम दादा मोहोळ, देविदास भन्साळी, लहू अण्णा निवंगुणे, श्रीरंग नाना चव्हाण, निखिल कवीश्वर, पृथ्वीराज पाटील, अवधूत मते, आकाश मोरे तसेच पुरंदर काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप आण्णा पोमण, साहेबराव फडतरे, भैय्या महाजन आणि सचिन दुर्गाडे यांनी त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले.

Post a Comment

0 Comments